प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात नुकतेच राजकीय घडामोडी झाल्याने सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याना आपल्या कृषिमंत्री पदाला मुकावं लागलं आणि उपमुख्यामंत्री अजित पवार यांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्री पदाची लॉटरी लागली. दत्तात्रय भरणे यांना कृषी खते मिळाल्याने इंदापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई अद्याप शेतकर्यांना मिळाली नाही. यात भरणे यांना मंत्रिपद मिळाल्याने आता इंदापूर तालुक्यातील शेतकयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळेल अशी आशा पुन्हा तीव्र झाली आहे. राज्यात कृषी विभागाला आवश्यक निधी नसल्याने कृषी विभागाच्या अनेक योजना प्रलंबित आहेत. शिवाय अनेक योजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. आता भरणे यांच्या काळात शेतकर्यांच्या योजनांना गती मिळेल अशी आशा शेतकयांना निर्माण झाली आहे. भरणे हे पदाला न्याय देणारा नेता असल्याची भावना जनतेत आहे. या खात्याचा कार्यभार कुशलतेने सांभाळून शेतकर्यांसाठी चांगलं काम होईल अशी अशा राज्यातील शेतकर्यांना निर्माण झाली आहे.