शेतकऱ्यांची केंद्रासोबतची चर्चा निष्फळ; 2500 ट्रॅक्टरमधून अन्नदात्याची दिल्लीकडे कूच

Farmers’ ‘Delhi-Chalo’ march। केंद्र सरकारकडे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आज दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, त्याआधी काल शेतकरी संघटनाची केंद्रासोबतची चर्चा निष्फळ ठरली. एमएसपीबाबत शेतकरी कोणत्याही किंमतीत तडजोड करण्यास तयार नाहीत. सरकार आपल्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले.
चंदीगडमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अर्जुन मुंडा यांच्यासोबत शेतकरी संघटनांची साडेपाच तासांची बैठक अयशस्वी ठरली. त्यामुळे त्यांचा दिल्लीपर्यंतचा मोर्चा कायम राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. एमएसपीबाबत शेतकरी कोणत्याही किंमतीत तडजोड करण्यास तयार नाहीत. सरकार आपल्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
20 हजार शेतकऱ्यांची 2500 ट्रॅक्टरमधून दिल्लीकडे कूच Farmers’ ‘Delhi-Chalo’ march।
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार 13 फेब्रुवारीच्या ‘दिल्ली चलो मार्च’मध्ये सुमारे 20 हजार शेतकरी 2500 ट्रॅक्टरमधून दिल्लीला पोहोचू शकतात. हरियाणा आणि पंजाबच्या अनेक सीमावर्ती भागात आंदोलक उपस्थित आहेत. हे आंदोलक दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आज सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी दिल्लीच्या दिशेने पुढे जातील. शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारीला भारत बंद पुकारलाय.
शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करता कामा नये Farmers’ ‘Delhi-Chalo’ march।
त्याचबरोबर आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्ली सीमेवरून दिल्लीत प्रवेश करता काम नये, अशा कडक सूचना दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर एकमत झाल्याची बातमी आली होती.
सरकारने वीज कायदा 2020 रद्द करण्याचे, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आणि शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचे मान्य केल्याचा दावा केला.
दिलीत एक महिना कलम १४४ लागू Farmers’ ‘Delhi-Chalo’ march।
दिल्लीत पुढचा एक महिना कलम 144 लागू करण्यात आलेय. या कालावधीत परिसरात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोक जमू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो मोर्चा’मुळे तणाव, अशांतता, अशांतता आणि हिंसाचाराचा धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे कलम लागू करण्यात आलंय.





