खत विक्रेत्यांकडून होतेय शेतकऱ्यांची अडवणूक
Updated On:

शेवगाव – तालुक्यामध्ये ऑनलाईन युरीया खताचा हजारो गोण्यांचा स्टॉक दाखवत असतांना शेतकऱ्यांना मात्र एक गोणी खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच काही दुकानदारांकडे थोडाफार खत शिल्लक असल्यास तो युरियाच्या गोणी सोबत इतर नको असलेली औषधे किंवा दुसरे खत घेण्यासाठी भाग पाडत आहेत.
अशा खत विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शेतात जी पीके उभी आहेत. त्याच्यासाठी युरियाची आवश्यकता आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी संपर्क साधला असता तालुक्यांत खत दुकानदारांच्या चुकांमुळे हजारो गोण्यांचा शिल्लक दिसत आहे. त्यामुळे नवीन खत उपलब्ध होण्यास वेळ लागणार आहे.





