शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या गाडीचा भीषण अपघात, सीट बेल्टमुळे थोडक्यात बचावले प्राण

Farmer Leader Rakesh Tikait | शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आला आहे. गाडीसमोर प्राणी आल्याने हा अपघात झाला. या घटनेत राकेश टिकैत हे थोडक्यात बचावले. घटनेमध्ये गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले.
राकेश टिकैत हे शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आले होते. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात ते अग्रेसर होते.
सिसौलीहून मुझफ्फरनगरला परतत असताना भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या कारला एका नील गायीची धडक झाली. एअरबॅग्स उघडल्यामुळे राकेश टिकैत थोडक्यात बचावले. या घटनेत गाडीचे खूप नुकसान झाले.
अभी-अभीः बडे हादसे में बाल-बाल बचे राकेश टिकैत, मुजफ्फरनगर बाईपास पर नीलगाय से टकराई कार, एयरबैग खुलने से बची जान @RakeshTikaitBKU @OfficialBKU #Rakeshtikait #Muzaffarnagar pic.twitter.com/LWhRdXqoIz
— Amrish Baliyan (@amrishbaliyan) March 14, 2025
राकेश टिकैत हे होळीनिमित्त सिसौली येथे आले होते. त्यानंतर ते कार्तकर्त्यांसह मुझफ्फरनगरला परत जात असताना वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. नीलगाय समोर चालकाने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नीलगायची धडक झाली.
सीट बेल्ट लावलेले असल्याने व एअरबॅग्स उघडल्याने राकेश टिकैत यांचे प्राण थोडक्यात वाचले. त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत व कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या 3 कृषि कायद्यांविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत हे प्रमुख चेहरा होते. तसेच, ते भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत.



