Farhan Akhtar On Don 3 Film | गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी ‘डॉन ३’ ची घोषणा केली. विशेष म्हणजे डॉन 3 चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहे. यापूर्वी डॉन चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन दिसले होते. त्यानंतरच्या भूमिकेत अभिनेता शाहरुख खान पाहायला मिळाला. यावेळीरणवीरला संधी देण्यात आल्याने यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता दिग्दर्शक फरहान अख्तरने या चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे. यादरम्यान फरहान अख्तरने चाहत्यांना लवकरच शाहरुख खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर १०० टक्के काम करणार असल्याचेही आश्वासन दिले आहे. एका मुलाखतीत फराहन अख्तर म्हणाला की, “चित्रपटावर अजुन काम सुरू असून याच्या शुटिंगला २०२५ पासून सुरूवात होणार आहे. कारण सध्या रणवीर सिंहला त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. सध्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.” लवकरच दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे रणवीर त्याच्या फॅमिलीसोबत काही दिवस क्वालिटी टाईम स्पेंड करू इच्छितो. ‘डॉन ३’साठी निर्मात्यांनी रणवीरचे इतर प्रोजेक्ट्सही थांबवलेले आहेत. Farhan Akhtar On Don 3 Film | या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. त्याशिवाय रणवीर ‘सिंघम अगेन’मध्येही दिसणार आहे. Farhan Akhtar On Don 3 Film | हेही वाचा: रकुल प्रीत – जॅकी भगनानीने केली अनोखी योगासने चाहते म्हणाले,’कपल गोल’