farah khan: बॉलीवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान आता चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त चर्चेत असते. २०२४ मध्ये तिने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनेलमुळे ती फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सेलिब्रिटी मुलाखती, कुकिंग व्लॉग्स, आणि तिच्या मदतनीस दिलीपसोबतचे मजेदार व्हिडीओ यामुळे फराहचं चॅनेल सतत ट्रेंडमध्ये असतं. यूट्यूब चॅनेल का सुरू केलं? फराह सांगते की, “नवीन चित्रपटाचं शूट एक वर्षानं सुरू होणार होतं. टीमनंही चॅनेल सुरू करायला सांगितलं. आणि माझी मुलं आता उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने त्यांच्यासाठी पैसे जमवावे लागणार होते… म्हणून मी यूट्यूब सुरू केलं.” म्हणजेच, मुलांच्या शिक्षणाची तयारी करताना तिनं कंटेंट क्रिएशनमध्ये उडी मारली. दिलीपसोबतचे व्हिडीओ झाले सुपरहिट फूड रिलेटेड व्हिडीओ करताना फराहनं तिच्या स्वयंपाकी दिलीपला देखील फ्रेममध्ये आणलं. “कोणीतरी मजा करणारा, बिनधास्त बोलणारा हवा होता… म्हणून दिलीपला घेतलं,” ती म्हणते. तिचा दुसरा व्हिडीओ आला आणि थेट सिल्व्हर बटन मिळालं. म्हणजे सुरुवातीलाच मोठा धमाका. फराहचं कमाईवर मोठं विधान सोहा अली खानशी बोलताना फराहनं उघडपणे सांगितलं,”मी यूट्यूबवरून खूप कमावते… चित्रपटांपेक्षाही जास्त!” यावर ती आणखी गंमतीनं म्हणाली, “दिग्दर्शन करून कधीच एका वर्षात इतकी कमाई झाली नव्हती.” म्हणजेच, ज्या चित्रपटसृष्टीत तिनं दशकभर काम केलं, त्यापेक्षा यूट्यूबने तिला जास्त कमाई दिली! फराह खानचा कंटेंट गेम मजबूत! सेलिब्रिटी मुलाखती फूड व्लॉग्स दिलीपसोबतच्या मजेशीर गप्पा सहज, मजेशीर, रिलेटेबल व्हिडीओ यामुळे फराह आज सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रिय झाली आहे.