मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.
Sir.. muje Maldieves jana hai.. Pocha ke do naa.. 😬😬😞😞
— Paarth (@CA_Paarth) October 30, 2020
दरम्यान, अशात सोशल मीडियावर एका फॅनने सोनूकडे अशी मागणी केली की, सगळ्यांना हसू आवरणं कठिण झालंय. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये लिहिलं की, “सर मला मालदीवला जायचं आहे… पाठवून द्या.” यावर सोनूने फारच मजेदार उत्तर दिलं आहे.
साइकल पे जाओगे यां रिक्षा पे भाई ? https://t.co/RskTEsWT03
— sonu sood (@SonuSood) October 30, 2020
सोनूने उत्तर दिलं की, सायकलने जाशील की रिक्षाने भाऊ? सोनूच्या या ट्विटवर लोक हसून हसून लोटपोट होत आहेत. सोनूच्या ट्विटनंतर आणखीही काही यूजर्सने या फॅन्सच्या ट्विटला रिट्विट केलं आहे.
साइकल पे जाओगे यां रिक्षा पे भाई ? https://t.co/RskTEsWT03
— sonu sood (@SonuSood) October 30, 2020