चाहत्यांना लग्नाची प्रतिक्षा! विजय-रश्मिका एकाच कारमधून रवाना; मुंबई विमानतळावर काय घडलं?

Rashmika Mandanna | Vijay Deverakonda | नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चां नेहमी होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून विजय-रश्मिका यांच्या चाहत्यांनी लग्नाची वाट पाहत आहोत, अशा प्रकारच्या कमेंट्स व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर केल्या आहेत. त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
रश्मिका विजय यांच्या चाहत्यांना दोघांच्या रिलेशनशिपच्या सुरू असलेल्या बातम्या जाणून घ्यायला खूप आवडते. नुकतेच दोघेही मुंबई विमानतळावर एकत्रित दिसले. विमानतळावरून दोघेही एकाच कारमध्ये रवाना झाले. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे विजय रश्मिकाच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा सिनेविश्वात रंगू लागल्या आहेत.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का असा मुख्य प्रश्न आता विचारला जात आहे. बुधवारी १८ जून रोजी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुंबई विमानतळावरून कारमधून एकत्रित जात असताना पापाराझींनी त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही कोणतेही उत्तर दिले नाही. दोघांचा व्हिडीओ पापाराझी पेज ताहिर जासूससह तसेच अनेक अधिकृत पेजवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत दोघांच्याही तोंडावर मास्क असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पापाराझींनी त्यांचा एक व्हिडीओ बनवला असून ज्यामध्ये त्यांचे चेहरे दिसत आहेत. यामुळे दोघांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक झाले आहेत.
हेही वाचा: जॅकलीन फर्नांडिस पोहचली श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात; शेअर केले खास फोटो





