समंथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लुक पाहून चाहते झाले हैराण

Samantha Ruth Prabhu Look | साउथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत एंगेजमेंट केली. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले होते. मात्र यावर समंथाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यातच आता समंथाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका कार्यक्रमादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसली. तेव्हा तिचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच वेगळी दिसत होती. काही चाहत्यांनी तिला ओळखण्यासही नकार दिला.
हा व्हिडीओ पोस्ट होताच लोकांनी समांथाला काय झाले, असे विचारण्यास सुरुवात केली. सामंथाच्या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले, ‘तुला काय झाले, तू अजिबात सुंदर दिसत नाहीस.’ दुसऱ्याने लिहिले, ‘तिच्या चेहऱ्यावरून चमक गायब झाली आहे.’ काहींनी तिचे वजन खूप कमी झाले असून चेहरा देखील वेगळा दिसत असल्याचे म्हंटले आहे. Samantha Ruth Prabhu Look |
View this post on Instagram
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, समांथा रुथ प्रभू लवकरच सिटाडेल: हनी बनीमध्ये दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत वरूण धवन दिसेल. तर प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन त्याच्या मूळ आवृत्तीत दिसले होते.
दरम्यान, समंथा रुथ प्रभूचे लग्न साऊथ अभिनेता नागा चैतन्यसोबत झाले होते. मात्र चार वर्षांनंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि हे जोडपे वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलपालासोबत साखरपुडा केला असून दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
हेही वाचा:
US Open 2024 : ट्युनिशियाच्या ओन्स जाबेरची स्पर्धेतून अचानक माघार, समोर आलं ‘हे’ कारण…





