Actress Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर हि तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी परिचित आहे. ती मराठी खूप सुंदर बोलते. सोशल मीडियावरचा तिचा वावरही कायम असतो. ती कुठे लाँग टूरवर गेली की, त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच मृणालची स्वतःची अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे, ज्या स्टाईलमुळे ती नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. नुकतेच एका फॅशन इव्हेंटमध्ये मृणालने हजेरी लावली होती. तिने सुंदर ड्रेस वेअर केला होता. ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॅाक केला, यावेळचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या उत्कृष्ट अभिनयासह तिच्या आकर्षक लूक आणि अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तिने एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॅाक केला, यावेळी तिच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या अनेकांच्या नजरा हटत नव्हत्या. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर गौरी आणि नैनिकासाठी रंगीत ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केल्याचे दिसून येत आहे. View this post on Instagram A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) व्हिडीओमध्ये मृणाल रॅम्पवर चालताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. मृणाल ठाकूरने हिंदी, मराठी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली होती. लवकरच ती ‘दो दिवाने सेहर में’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘पूजा मेरी जान’ आणि ‘डकैत’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : ABC juice in Winter: हिवाळ्यात प्या ‘ट्रिपल एबीसी जूस’… चेहरा उजळेल, केसही होतील मजबूत