Toxic Release Date Postponed : अॅक्शन स्टार यशच्या टॅाक्सिक चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यानंतर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. १९ मार्च २०२६ या दिवशी टॅाक्सिक देशभरातील चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला असून, सोशल मीडियावरून या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १९ मार्च २०२६ या दिवशी धुरंधर: द रिव्हेंज आणि टॅाक्सिक दोन्ही चित्रपटांची कॅल्श होणार होती. पण टॅाक्सिकच्या निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकल्याने ही कॅल्श टळली आहे. रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावरून चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, या निर्णयावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि संघर्षांमुळे चित्रपटगृहे चालवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कारण हे देश “टॉक्सिक” च्या जागतिक प्रदर्शनासाठी प्रमुख बाजारपेठ आहेत. केव्हीएन प्रॉडक्शन्सने त्यांच्या तमिळ चित्रपट “जननायकन” ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, कंपनीने अॅक्शन स्टार यशच्या बहुचर्चित चित्रपट “टॉक्सिक” ची रिलीजची तारखही पुढे ढकलली आहे. केव्हीएन प्रॉडक्शनचे दोन बिग बजेट चित्रपट एकामागून एक पुढे ढकलण्यात आल्याने एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या निर्णयानुसार “जननायकन” आणि “टॉक्सिक” आता जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाची नेमकी तारीख याबाबतही अधिकृत सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या निर्णयानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर कमेंट केली, “हे प्रोडक्शन हाऊस शापित आहे का?” तर दुसऱ्याने लिहिले, “यशने त्याच्या चाहत्यांना पहिल्यांदाच पराभूत झाल्यासारखे वाटले आहे.” हेही वाचा : Airtel Plan: एअरटेलचा १८४९ रुपयांत वर्षभराचा प्लॅन! वारंवार रिचार्जच्या त्रासातून कायमची सुटका?