गाजलेले प्रकरण: १.८४ कोटी रक्कम घोटाळ्याला धुळे पोलिसांनी ठरवली अदखलपात्र! अनिल गोटे आक्रमक, दिला थेट इशारा

Arjun Khotkar| Anil Gote | शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या खोलीत तब्बल १.८४ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड सापडल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
तसेच जिल्हा पोलीस अधिकक्षकांना याबाबत तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाईत ही रक्कम जप्त केली होती. अशातच या प्रकरणात नुकताच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधीमंडळ अंदाज समितीचे प्रमख अर्जुन खोतकर आणि समितीचे सदस्य असलेल्या १२ आमदारांना वाटण्यासाठी लाच म्हणून ही रक्कम जमा केली होती, असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात बारा आमदारांनासह सहआरोपी करणे आवश्यक होते. मात्र, पोलीस याबाबत टाळाटाळ करत असल्याचे गोटे यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी १२ आमदारांवर कारवाई न केल्यास, न्यायालयात जाणार असल्याचा थेट इशारा आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या खोलीत १.८४ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली होती. याबाबत मजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांपासून तर जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत तक्रार केली होती. या प्रकरणाची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती.
मात्र, धुळे पोलिसांनी सुरुवातीपासून अतिशय संथ गतीने या प्रकरणाचा तपास केल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. त्या विरोधात आपण आवाज उठवणार असून राज्यभरातील सर्व यंत्रणांना याबाबत पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू; RSS आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक





