रजनीकांतच्या ‘जेलर २’ चित्रपटात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीची एन्ट्री

Jailer 2 Film | सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर २’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री विद्या बालनची यात एन्ट्री होणार आहे. या सिनेमातून विद्या तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
‘जेलर २’ मध्ये विद्या बालन मिथुन चक्रवर्ती यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मिथुन चक्रवर्ती या चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून दिसणार आहेत. रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती हे दोघेही या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चेन्नईमध्ये सुरू आहे. जानेवारीमध्ये चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन सुरू होईल. चेन्नईतील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर, टीम गोव्याला रवाना होईल. गोव्यात पुढील दोन महिन्यांचे चित्रीकरण केले जाईल. या कामाची तयारी ऑक्टोबरच्या शेवटी सुरू झाली आहे.
रजनीकांत पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत
‘जेलर २’ हा एक तमिळ ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. सन पिक्चर्सचे कलानिधी मारन या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये आलेल्या ‘जेलर’चा सिक्वेल आहे. यात रजनीकांत पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Jailer 2 Film |
View this post on Instagram
राम्या कृष्णन, योगी बाबू आणि मिर्ना हे कलाकार त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये परत येत आहेत. तर एस. जे. सूर्या एका नवीन भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शिव राजकुमार, नंदमुरी बालकृष्ण आणि मिथुन चक्रवर्ती हे विशेष भूमिकेत आहेत. यातील अभिनेत्री विद्या बालनच्या एन्ट्रीने चाहत्यांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. Jailer 2 Film |
हेही वाचा:





