Chitrangada Singh : सगळेजण दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मात्र, बॅालिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. यामुळे आता तिच्या चाहत्यांना चिंता लागली आहे. अचानक अभिनेत्रीला नेमकं काय झाले आहे, असा प्रश्न चाहते विचारताना दिसत आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंहने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती रुग्णालयातील एका बेडवर असून तिच्या हाताला ड्रिप लावलेली दिसत आहे. अभिनेत्री चित्रांगदा सलमान खानसोबत आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये दिसणार आहे. त्याआधीच तिची प्रकृती बिघडल्याने चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत. पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिला नेमके काय झाले आहे, याबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, फोटोसोबत तिने ‘लवकरच मी सश्यासारखी धावायला लागेन’, असे म्हटले आहे. चित्रांगदा नुकतीच ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसली होती. या सिनेमानंतर तिला थेट सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे चाहते तिच्या या सिनेमातील भूमिकेसाठी आतुर झाले आहेत. चित्रागंदा बॅालिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक सिनेमात काम केले असून, काही सिनेमात अॅटम साँगही केले आहे. बऱ्याच काळानंतर ती हाऊसफुल ५ मध्ये दिसली. आता ती सलमान खानसोबत बॅटल अॅाफ गलवान सिनेमात झळकणार आहे. हेही वाचा : मनसेच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी! ‘दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच….,’ म्हणत मनसेने लगावला टोला