प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयरालाने चाहत्यांसाठी लिहिला खास संदेश; योगा करतानाचा फोटो केला शेअर म्हणाली…

Manisha Koirala : प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयरालाने आज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत मनीषा योगा करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये मनीषाने तिच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश शेअर केला आहे.
अभिनेत्री मनीषा कोयरालाने जीवनातील अनिश्चितता आणि गुंतागुंतींना तोंड देण्याचा तिचा मार्ग काय आहे, याबाबत सांगितले आहे. आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामाना करावा लागतो. कठीण काळातील प्रसंगांना तोंड देण्यासाठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. अभिनेत्रीने योग साधणेचे महत्व अधोरिखेत केले आहे. तिच्यासाठी योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर घरी आल्यासारखे असल्याचे अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
View this post on Instagram
मनीषाने इंस्टाग्रामवर योगा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती सुखासन करताना दिसत आहे. तिने लिहिले आहे की, “जेव्हा जीवन अनिश्चित वाटते आणि माझे मन भटकते तेव्हा मी शांती शोधते. योग हे संतुलन प्रदान करते, जे मी शोधत नाही, परंतु त्याकडे परत आल्यावर मला मिळते.” असे अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्त्रीत्वाबद्दल बोलताना ती म्हणाली, “स्त्रीत्व सोपे नाही. ते जीवन, मैत्री आणि सन्मानाने वृद्धत्व याबद्दल आहे. आपण अशा लोकांना निवडले पाहिजे जे आपल्या जीवनात अर्थ भरतात.” असेही अभिनेत्री मनीषा कोयराला हिने पोस्टमध्ये अधोरेखित केले आहे. ५४ वर्षीय मनीषा कोयरला शेवटची संजय लीला भन्साळी यांच्या “हीरा मंडी: द डायमंड बाजार” या वेब सिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजमधील तिच्या पात्राचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
हेही वाचा : “नीतीश कुमार शिंदे नाहीत! मालकाच्या घरातून….; बिहारच्या बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंना डिवचलं





