Actor Suyash Tilak car accident : प्रसिद्ध अभिनेत्याचा कारचा अपघात; तासाभरानंतर मिळाली मदत …; नेमकं काय घडलं सुयश टिळकसोबत?

Actor Suyash Tilak car accident : ‘का रे दुरावा’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता सुयश टिळक याच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सुयशनं स्वतः याबाबत इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या व्हिडीओतून सुयश टिळकनं अपघाताच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अपघात झाला असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण अभिनेत्याने त्याच्यासोबत जे काही यानंतर घडलं त्याबाबत सांगितल्याने ते ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे. अपघाताच्या घटनेनंतर सुयशला मुंबई गाठण्यासाठी मोठं कष्ट घ्यावे लागले आहेत. तासाभरानंतर त्याला मदत मिळाली असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.
काय म्हणाला सुयश?
वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास… थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, झालेल्या नुकसानामुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने गाडी टोईंन करून आली पण दरम्यानच्या प्रवासाचा अनुभव त्याने शेअर केला आहे.
View this post on Instagram
घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून थेट मुंबईत आणणे. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हर म्हणाला,” तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीचा गरज भासली तर मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी बसलो होतो एका शांत, एसी नसलेल्या माझ्या गाडीत. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते, असं सुयश टिळकने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
तुम्ही याचा आनंद घ्या!
कोणासोबत असा काही प्रसंग घडला तर चिडचीड होते. पण अभिनेत्याने हा प्रवास छान एन्जॅाय केला आहे. या प्रवासात त्याने पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपला. दिवसभराचा अनुभव त्याने मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करून मिनी व्लॅाग बनविला. तुम्ही या व्लॅागचा आनंद घ्या, असं सुयशने म्हटलं आहे.
लाखात एक गोष्ट बोलला अभिनेता
कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून..खोल श्वास घेऊन.. तो प्रवास एन्जॉय करू शकता, अशी लाखात एक गोष्ट बोलून अभिनेत्याने मोठं स्टेटमेंट केलं आहे.
हेही वाचा : गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार ; आयडीएफने एका म्हटले हमास दहशतवादी





