प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद यांचं कर्करोगामुळे ‘निधन’; बॉलिवूडवर शोककळा पसरली

Junior Mehmood passed away – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगाशी लढा देऊन निधन झाले आहे. ज्युनियर महमूद स्टेज 4 पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ज्युनियर महमूद यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Please pray for Jr Mehmood ji. He has been diagnosed with stomach cancer 🙏 pic.twitter.com/ZN4gSWbz0n
— raju (@itsMasterRaju) December 3, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजनंतर जुहू येथील कब्रस्तानात ज्युनियर महमूद यांना जुहूच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1956 रोजी झाला. ज्युनियर महमूदला पोटाचा कर्करोग झाल्याची बातमी मास्टर राजू यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. यानंतर काही स्टार्सही त्यांना भेटायला गेले होते.
मास्टर राजू यांनी पोस्टच्या माध्यमातून ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीची माहिती काही दिवसांपूर्वी शेअर केली होती, अभिनेत्यासोबतचा एक फोटो शेअर करत मास्टर राजूने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘ज्युनियर महमूद जी यांना पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. कृपया सर्वानी त्यांच्या साठी प्रार्थना करावी.’ यानंतर महमूदच्या मदतीसाठी जॉनी लीव्हर ज्युनियर पुढे आला.
View this post on Instagram
ज्युनियर महमूद कोण होता?
ज्युनियर महमूदचे खरे नाव नईम सय्यद होते. त्याने रुपेरी पडद्यासाठी ज्युनियर मेहमूद हे नाव धारण केले. ज्युनियर मेहमूदने बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्यांना चित्रपटांमध्ये विशेष ओळख मिळाली. ‘बचपन’, ‘गीत गाता चाल’, ‘कटी पतंग’, ‘मेरा नाम जोकर’, ‘ब्रह्मचारी’ आणि इतर चित्रपटांमध्ये तो दिसला होता. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र सचिन पिळगावकर हाही बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये दिसला होता. दोघांची जोडी चांगलीच गाजली.





