फलाहार म्हणजे एक प्रकारचे अमृतसेवनच

पुणे – शरीरातली रोगप्रतिकारक शक्‍ती जेव्हा कमी होऊ लागते, तेव्हा आपल्याला निरनिराळे रोग जडू लागतात. मानसिक तणाव, अनियमित जीवन अशा इतर काही कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते. 

अनियमित जीवनशैली अनेक समस्यांना जन्म देते. आज अनेक लोकांचं झोपणं-उठणं, खाणं अनियमित आहे. त्यामुळे शरीराचं निष्कासन कार्य नीट होत नाही आणि शरीरात विष साठू लागतं, पचनाच्या तक्रारी निर्माण होतात.

मानसिक तणावांचा परिणामही आरोग्यावर होतो. आजच्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनाचा हा परिणाम आहे. मानसिक ताणतणावाचा रोगप्रतिकारक शक्‍तीवर खूप परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम पचनक्रियेवरही होतात.

आजकाल बऱ्याच व्यक्‍ती शारीरिक श्रम असणारं काम करण्यास टाळाटाळ करतात. समाजातला खूप मोठा घटक आज श्रमहीन जीवन जगतोय! यामुळे शरीराची कार्यक्षमता आणि मजबूतपणा घटतो. श्रम केल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्‍ती वाढते. 

वाईट सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्‍ती कमी होते. शरीराची रोगप्रतिकारकशक्‍ती बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन्सवर अवलंबून असते. दारू पिणं, तंबाखू खाणं, जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणं,चरस-गांजा ओढणं शरीरातली जीवनसत्त्वं नष्ट करतात.

एक सिगारेट ओढल्याने 25 मि.ग्रॅ. एवढं “सी’व्हिटॅमिन घटतं,हे विज्ञानानं सिद्ध केले आहे. अनियमित खाण्यापिण्याने शरीरातली आतली शक्‍ती क मी होते. खूप मसालेदार, तळलेले पदार्थ, मिठाई, थंड पदार्थ यांच्या प्रमाणाबाहेर सेवनानं रोगप्रतिकारकशक्तीही घटते. प्रमाणाबाहेर खाणं, सारखं सारखं खाणं या सवयींनी पचनक्रिया बिघडते.

रसाहारसुद्धा घ्या !
– फळांचा आणि भाज्यांचा दोन्हींचा रस उपयुक्‍त असतो. तो प्यायल्याने शारीरिक व मानसिक विकार दूर होऊन,शरीर निरोगी राहातं. फळांचा,कच्च्या भाज्यांचा रस कुणीही पिऊ शकतं. रसातली पोषक तत्त्वं सहजपणे रक्‍तात मिसळली जातात. अल्सरचे रुग्णदेखील फळांचा रस घेऊ शकतात. उपासात केवळ रस पिऊन शरीरशुद्धी केली जाऊ शकते. रसातली साखर हृदय मजबूत करते, मात्र फळ व भाज्या यांचे एकत्रित रस पिऊ नयेत. रस पचविण्यासाठी पचनेंद्रियांना खूपच कमी शक्‍ती वापरावी लागत असल्यानं,शरीराची रोग प्रतिकारकशक्‍ती वाढते. रससेवनानं सौंदर्यातही वृद्धी होते.

– सर्दी-पडसं, हृदयविकार, ब्लडप्रेशर, टी.बी., एड्‌स, कॅन्सर या आजारात रस अमृताप्रमाणे करतात. सॅलड चावून खाण्यास वेळ लागतो. त्यामुळे वेळ नसल्यास रस प्यावा. त्यातही पौष्टिक तत्त्वं असतात. पोटात, आतड्यात व्रण (अल्सर) सूज असल्यास रसाहार गुणकारी ठरतो.

– लहान मुलांसाठी रसाहार चांगला असतो. मुलं फळं, भाज्या, अन्न खाऊ शकत नाहीत पण रस पिऊ शकतात. ग्रंथींच्या विकासात रस महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून वाढत्या वयातल्या मुला-मुलींना रस अवश्‍य दिलाच पाहिजे. गर्भवती महिलांनीही रसाहार घेतला पाहिजे.रसात इन्शुलिनसारखा घटक असतो. काकडी व कांद्याच्या रसात उसे हार्मोन असतात. जे इन्शुलिन निर्माण करण्यासाठी कलोम कोषासाठी आवश्‍यक असतात.याशिवाय कांदा, लसूण, टोमॅटोच्या रसात किटाणुनाशक तत्त्वं असतात.

– गाजराचा रस व त्याच्या अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस घ्या. असा हा एकत्र केलेला रस प्यायल्याने रक्‍ताची कमतरता, हृदविकार, कॅन्सर, मोतिबिंदू, सर्दी-पडसं, नेत्ररोग, मलावरोध, हर्णिया, वातरोग यामध्ये फायदा होतो. गाजराचा रस एक कप, काकडीचा रस अर्धा कप व पालकरस अर्धा कप,असा रस प्यायल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होते.

– बीट, टोमॅटो, गाजर, संत्र यांचा प्रत्येक 25 ग्रॅम रस रोज दोन महिने प्यायल्यास चेहऱ्यावरचे डाग, मुरमं, काळसर डाग नाहीसे होऊन चेहरा स्वच्छ, सुंदर होतो. गरम पाण्यात एक लिंबू पिळा व सकाळी हे पाणी प्या.नंतर गाजराचा रस, त्याच्या अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस एकत्र करून प्या. याने जाडेपणा कमी होतो.

– फळांचा किंवा भाज्यांचा रस मुख्य आहाराबरोबर घेऊ नये. रस एकतर खाण्याच्या आधी एक तास किंवा खाल्ल्यानंतर एक तासानं प्यावा. एकावेळी200-300 मि.लि. पेक्षा जास्त रस पिऊ नये. उपासात रस दोन ते अडीच तासांच्या अंतरानं 6-7 वेळा घेऊ शकता येतो. रस प्यायल्यावर पोटात दुखणं,हे रस आपलं स्वच्छतेचं काम करत असल्याचं लक्षण आहे. रसाची मात्रा अधिक वाटत असले तर कमी करा.30-40दिवस रस उपवास करता येतो. रस घेतल्यावर विश्रांती घ्या.

रसाहार व आजार
– पोटदुखी, जुलाब, उलटी, डोकेदुखी, झोप न येणं, ताप अशा तक्रारी रसाहारात उद्‌भवू शकतात. पण औषध घेऊन त्या थांबवू नका. काही वेळाने आपोआप या तक्रारी नाहीशा होतील. विषारी पदार्थ बाहेर गेल्याने वजनही कमी होतं.
– गाजर(लसूण, मध) क्षयरोग नष्ट करतो.
– शरीरात रक्त कमी असेल तर गाजर, टोमॅटो, काकडी, पालक, मुळा या रसांनी लाभ होतो.
– हृदयरोगावर पपई, नारळपाणी,नासपती, द्राक्षं,गाजर, सफरचंद, डाळिंब (लिंबू, लसूण, मध) हे रस उपयोगी आहेत.
– मधुमेहात मुळा,आवळा, कारलं, टोमॅटो, काकडी, गाजर, पालक, डाळिंब, संत्र या रसांचा फायदा होतो.
– काकडी, टोमॅटो, मुळा, संत्र, मोसंबी, टरबूज, लिंबू, (गरम पाणी, मध) हे रस जाडेपणावर उपयोगी आहेत.
– आम्ल पित्तात टरबूज, द्राक्षं, सफरचंद, मुळा (गाजर, कोबी) या रसांनी आराम पडतो.
– झोपेची तक्रार असेल तर (गाजर, पालक), (कांदा, मध), द्राक्षं अशा रसांचं सेवन करा.
– उच्च रक्‍तदाबात गहू, ज्वारी, डाळिंब, संत्र, पपई, लिंबू, टोमॅटो, बीट, लसूण हे रस गुणकारी ठरतात.
–  मलावरोधाचा त्रास असेल तर काकडी, पालक, मुळा, आवळा, गाजर, ऊस, सफरचंद, संत्र, मोसंबी, पेरू, पपई, दुधीभोपळा यांचे रस प्या.
– संधिवातात लसूण,मेथी, सफरचंद(आलं, लिंबू, मध), (आलं, मुळा, कोबी) हे रस प्या.
– खोकला असेल तर (लसूण, मध), (कांदा, मध) हे रस घ्या.
– ज्वरात डाळिंब, संत्र, मोसंब, लिंबू यांचे रस प्यावेत.
– सर्दी-पडश्‍यावर (आलं, लिंबू, मध), डाळिंब, सफरचंद, संत्र, मोसंब यांचे रस गुणकारी आहेत.
– जुलाब होत असतील तर अननस, बेल, सफरचंद, बीट असे रस प्या.
– नेत्ररोगावर (आंबा, दूध, मध), (आवळा, मध), पपई, गाजर, टोमॅटो, मुळा, पालक, चवळी, कोथिंबीर यांचे रस गुणकारी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.