मुंबई – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा परिसरातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. धंगेकर यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे.
दरम्यान, कसब्यातील निकालाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल मीडियावर एक बनावट ट्विट व्हायरल झालं असून यामध्ये राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून मा. गडकरीजी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) March 3, 2023
मात्र, या ट्विट संदर्भात गडकरी यांच्या कार्यालयाने खुलासा करून पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. सर्व संबंधित पोस्टची सविस्तर माहितीही नागपूर पोलिसांना सादर केली आहे. तसेच, या खोडसाळपणाबद्दल संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करावी. अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) March 3, 2023
नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली आहे. पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात नितीन गडकरी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत. या आशयाचे ट्विट नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने केलं. त्यामुळे पोलीस अधिकारी या घटनेचा संपूर्ण तपास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.