फैजाबाद दुहेरी स्फोट प्रकरणी दोघांना जन्मठेप
Updated On:

लखनौ : उत्तरप्रदेशमधील फैजाबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली. तो निकाल विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला.
फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात 23 नोव्हेंबर 2007 या दिवशी एकापाठोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले. त्या स्फोटात एका वकिलासह 5 जण मृत्युमुखी पडले, तर 24 जण जखमी झाले. त्या दुहेरी स्फोट प्रकरणाशी संबंधित खटल्याचा निकाल शुक्रवारी 12 वर्षांनी जाहीर करण्यात आला.
त्यानुसार, तारिक काजमी आणि मोहम्मद अख्तर या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर सज्जाद उर रहमान या तिसऱ्या आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. स्फोट प्रकरणातील चौथा आरोपी खालिद मुजाहिद याचा याआधीच पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला.





