मुंबई – प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘नागिन 7’ च्या कास्टिंगबद्दल चाहते खूप उत्सुक आहे, कारण प्रत्येकाला या शोमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहायचे आहे. आयशा सिंग आणि फहमन खान ही नागिनच्या आगामी सीझनची मुख्य जोडी असू शकते, गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांना नागिन 7 सुरू होण्याची वाट बघत आहे. नागिन 7 वर्ल्ड कपनंतरच कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल. बिग बॉस दरम्यान एकता कपूर या शोची घोषणा करू शकते. या सीझनमध्ये फहमान खान आयशा सिंगसोबत रोमान्स करणार असल्याचीही चर्चा सध्या चाहत्यांमध्ये होत आहे.
इमलीनंतर फहमान खान कलर्स टीव्हीच्या ‘धर्मपत्नी’ या मालिकेत बराच काळ काम करत होता. धर्मपत्नीनंतर फहमनला दोन शोसाठी संपर्क करण्यात आला आहे. नागिन 7 सोबतच जेनिफर विंगेटसोबत लवकरच सुरू होणाऱ्या टीव्ही सीरियलसाठीही फहमन खानच्या नावाची चर्चा आहे. आता या दोन टीव्ही मालिकांपैकी फहमान कोणत्या मालिकेत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
याआधीही अनेकवेळा सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली होती की, आयशा सिंग नागिनमध्ये तेजस्वी प्रकाशची जागा घेणार आहे, मात्र आयशाने या चर्चांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.अनेक वेळा प्रॉडक्शन हाऊससोबत केलेल्या करारामुळे कलाकारांना त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल मीडियाशी बोलू दिले जात नाही. याच कारणामुळे अनेकदा कलाकार शोमध्ये येण्याच्या बातम्या चुकीच्या घोषित करतात.
बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच एकता कपूरने तेजस्वी प्रकाशला नागिनच्या रुपात पसंत केले. एकताच्या टीमने बिग बॉसमध्ये तेजस्वीला हा फँटसी फिक्शन शो ऑफर केला होता आणि बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेच्या दुसऱ्याच दिवसापासून तिने नागिनसाठी शूटिंग सुरू केले.