FADA | इन्व्हेंटरी आणखी कमी करण्याची गरज; वाहन वितरकांच्या संघटनेची कंपन्याकडे मागणी…

नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यात वितरकांची इनव्हेंटरी म्हणजे विक्रीविना पडून असलेल्या वाहनांची संख्या बरीच कमी झाली आहे. मात्र अजूनही यात सुधारणा करण्यास आहे. यासाठी कंपन्यांनी आणखी कमी वाहन पुरवठा करून इन्व्हेंटरी कमी करावी. शक्यतो 21 दिवस पुरेल एवढाच वाहनांचा साठा असण्याची गरज असते. मात्र सध्या वितरकाकडे त्यापेक्षा जास्त वाहनांचा साठा आहे, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन Federation of Automobile Dealers Associations (FADA) या संघटनेचे म्हणणे आहे.
दसरा दिवाळीत वाहनांच्या विक्रीत बरीच वाढ झाली. मात्र अजूनही 75 ते 80 दिवस पुरेल एवढा वाहनांचा साठा वितरकाकडे पडून आहे. याची नेमकी आकडेवारी लवकरच उपलब्ध होणार आहे. हा साठा 21 दिवस पुरेल एवढाच असणे योग्य मानले जाते.
या संघटनेचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणि काही राज्य सरकारनी पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे आगामी काळात व्यावसायिक वाहनांची विक्री वाढत राहण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पिकावर पावसाचा परिणाम झाला असला तरी रब्बीचे पीक चांगले येणार आहे. सरकारने किमन आशधारभूत दर वाढविले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची विक्री वाढू शकते.
Narayana Murthy | उत्पादकता वाढविण्यासाठी आठवड्यात कामाचे दिवस 6 असण्याची गरज- नारायण मूर्ती
ग्रामीण भागातून मागणी चांगली वाढल्यामुळे 42 दिवसाच्या उत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील विक्री 13.8% वाढण्यास मदत झाली. कंपन्यांनी आणि वितरकांनी बर्याच सवलती दिल्यामुळे उत्सवाच्या काळामध्ये एकूण वाहन विक्री 11.8% वाढून 42.88 लाख युनिट एवढी झाली. मात्र हा वेग आगामी काळात कायम राहण्याची शक्यता कमी आहे. कारण शहरी भागातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती कमी झाली आहे. या कालावधीत प्रवासी वाहनांची विक्री 7.1% वाढली. मात्र ट्रॅक्टरची विक्री कमी होऊन 85,216 वुनिट झाली.

