फैक्ट चेक : पीएम मोदींनी बागेश्वर धामला भेट दिली ? काय आहे त्या फोटो मागचे ‘सत्य’

Updated On:

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धाम येथे गेल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता तपासली असता तो खोटा असल्याचे दिसून आले आहे. मोदी आजपावेतो कधीही बागेश्वर धामला गेलेले नाहीत. या वदग्रस्त व्हिडिओमध्ये मोदी यांच्या फोटोचा वापर करून ते बागेश्वर धामला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या व्हिडिओची पडताळणी केली असता, नरेंद्र मोदी बागेश्वर धाम येथे कधीही न गेल्याचे आढळून आले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेला फोटो नेमका कोठून घेण्यात आला आहे. याची माहिती घेतली असता मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलची लिंक आढळली. हा व्हिडिओ आठ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. मोदींची केशरचना, जॅकेट आणि हातात बांधलेला काळा धागा व्हिडिओप्रमाणेच असल्याचे आढळले. हा व्हिडिओ कर्नाटकातील तुमकूर येथील सिद्धगंगा मठातील असून, २४ सप्टेंबर २०१४ रोजी मोदी श्री शिवकुमार स्वामी यांची भेट घेण्यासाठी तेथे गेले होते.

आणखी संबंधित बातम्या

Teachers' Day : "बालपण जपण्याचे काम..."; शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला शिक्षकांसोबत संवाद

2026-09-05 14:50:03

Teachers' Day : "बालपण जपण्याचे काम..."; शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला शिक्षकांसोबत संवाद

Punjab : पंजाबमध्ये शिख तरुणाचा कोठडीत अमानुष छळ; मानवाधिकार आयोगाकडे कारवाईची मागणी

2026-09-04 22:25:26

Punjab : पंजाबमध्ये शिख तरुणाचा कोठडीत अमानुष छळ; मानवाधिकार आयोगाकडे कारवाईची मागणी

Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या मध्यस्थीचे प्रयत्न !

2026-09-04 21:25:41

Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या मध्यस्थीचे प्रयत्न !

Devendra Fadnavis : "त्यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे..."; विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !

2026-09-04 19:48:57

Devendra Fadnavis : "त्यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे..."; विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल

2026-09-04 19:09:20

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल