काय आहे व्हायरल मेसेज ?
\nगेल्या काही दिवसांपासून व्हाॅट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये टाटा समुहाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विजयी झाल्यास कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या व्हायरल मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे. मात्र, टाटा ग्रुपकडून हे सर्व खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत ही लिंक पोहोचली असेल तर त्यावर क्लिक करून नये किंवा इतरांना पाठवू नये. कुठल्याही अमिषाला बळी पडू नये.
