April Fools Day निमित्ताने ट्विटरवर रंगला #PappuDiwas विरुद्ध #ModiMatBanao सामना

जगभरामध्ये आज १ एप्रिल हा दिवस एप्रिल-फूल्स-डे म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत असून लोक एकमेकांना फसवून इतरांच्या आयुष्यामध्ये हास्याचे कारंजे उडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकारणाची रणधुमाळी सुरु असून ‘एप्रिल-फूल्स-डे’चा वापर देखील राजकीय पक्षांकडून तसेच त्यांच्या समर्थकांकडून एकमेकांवर टीका करण्यासाठी करण्यात येत आहे.

‘एप्रिल-फूल्स-डे’च्या निमित्ताने आज भारतामध्ये ट्विटर या समाजमाध्यमावर राजकीय युद्ध रंगले आहे. ‘एप्रिल-फूल्स-डे’ला सत्ताधारी भाजपकडून #PappuDiwas जाहीर करण्यात आले आहे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे आजच्या ‘एप्रिल-फूल्स-डे’ निमित्ताने #ModiMatBanao असा हॅशटॅग ट्विट करण्यात आला आहे.

#PappuDiwas आणि #ModiMatBanao हे दोन्हीही हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंडिंग असून या हॅशटॅगद्वारे भाजप व काँग्रेससमर्थकांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरु आहे. मोदी समर्थकांकडून काँग्रेस अध्यक्षांना पप्पू म्हणून हिणवण्यात येत आहे तर काँग्रेस समर्थकांकडून पंतप्रधानांची खिल्ली उडवताना मोदी मत बनाओ असा हॅशटॅग देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.