पुणे – राज्यातील ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमधील 138 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास राज्य शासनाकडून मुदतवाढ देण्यात येणार आहे.
या कार्यालयांसाठी एकूण 447 पदे मंजूर केली आहेत. त्यातील 309 पदे स्थायी स्वरुपात भरली असून उर्वरित अस्थायी स्वरुपात आहेत.
अस्थायी पदे 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुढे या पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांचा प्रदान केले आहेत.
त्याअनुषंगाने शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. त्याबाबतचे आदेशही कार्यासन अधिकारी अ. र. काटकर यांनी काढले.