खडकवासलातून विसर्ग वाढविला
Updated On:

पुणे -जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी रात्रभर पाऊस झाला. धरणांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली.
आधीच धरणे काठोकाठ भरली असल्याने धरणांमध्ये पाण्याचा येणारा येवा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. सकाळी आठ वाजता 3 हजार 424 क्युसेकने विसर्ग सुरु होता.
त्यामध्ये पाच वाजता वाढ करून विसर्ग वाढविण्यात आला. 5 हजार 136 क्युसेकने खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी सोडले जात आहे.





