शिवसेनेने आणखी दोन बड्या नेत्याची केली पक्षातून “हकालपट्टी”
Updated On:

मुंबई – शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.





