पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ट्रेन क्रमांक १२७८०/१२७७९ निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी आणि २२६८५/२२६८६ यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस (१२७८०) आठ ऑक्टोबरला किर्लोस्करवाडी येथे रात्री नऊ वाजून १३ मिनिटांनी पोहोचेल आणि एका मिनिट या स्टेशनवर थांबेल. १२७७९ वास्को द गामा-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस नऊ ऑक्टोबरला किर्लोस्करवाडी येथे रात्री अकरा वाजून २३ मिनिटांनी पोहोचेल आणि एका मिनिटाचा थांबा घेऊन निघेल. यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस (२२६८५) सांगलीला दुपारी तीन वाजता पोहोचेल आणि तीन वाजून ३४ मिनिटांनी सुटेल. चंदीगड- यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस (२२६८६) सांगलीला दुपारी तीन वाजून ५२ मिनिटांनी पोहोचेल आणि ती एका मिनिटांचा थांबा घेऊन निघेल.