धारावीतील सर्व कोरोनाबाधितांचे मरकज कनेक्शन उघड

मुंबई : राज्यात विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील वरळी, धारावी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. एकट्या धारावीत कोरोनाचे 13 रुग्ण सापडले आहेत. या सर्व कोरोनाबाधितांचे निजामुद्दीन मरकज कनेक्शन असल्याची माहिती आता उघड झाली आहे.
धारावीतील हे सर्व 13 रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमातून परतलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे धारावीतील सर्व कोरोनाबाधितांना मशिदीतून लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातच्या मरकजमुळे कोरोनाबाधितांच्या आकड्या वेगाने वाढ झाली असे आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे. देश विदेशातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर हे विविध राज्यांमध्ये गेले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. धारावीत सापडलेले सर्व कोरोनाबाधित हे निजामुद्दीन मरकजमधून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले आणि त्यांना मशिदीतून कोरोनाची लागण झाल्याचे समजते.





