अकोला: राज्याचे विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोराना पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती नंतर त्यांनी अकोल्याला भेट दिली. अकोल्यातील कोविड सेंटर, काही क्वारंटाईन सेंटर्सला भेटी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून आज येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पीएम केअर्सला कंपन्यांनी निधी दिला, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले. चीनच्या दुतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला जी आर्थिक मदत दिली, त्यावर प्रथम खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला पाहिजे.पीएम केअर्सला कंपन्यांनी निधी दिला, त्यात गैर काही नाही. कारण, सीएसआरनुसार कंपन्यांना असे योगदान द्यावेच लागते.
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संभ्रमावर फडणवीस म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या राज्य सरकार पूर्णत: संभ्रमावस्थेत आहे. एटीकेटीबाबतचा विचार नाही. परीक्षा झालीच तर मूल्यांकनाची समान पद्धत नाही. संभ्रमावस्थेत न राहता ठोस निर्णय राज्य सरकारने करावा.