पुणे महापालिका हद्दीत 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची विधानसभेत मागणी

पुणे – पुणे महापालिका हद्दीतील ५०० स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कांग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातुन उपस्थित केली.
मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीमधे ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवाशी मिळकतीना मालमत्ता करामधून पूर्ण सुठ देण्यात आली आहे.त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीमधील ५०० चौरस फुठापर्यंतच्या घरांना मालमत्ता कारमध्ये सवलत द्यावी अशी मागणी धंगेकर यांनी विधानसभेत केली. रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुखाने ५०० स्केअर फुठांच्या घरांमध्ये राहतात.
पुणे शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे,लगतची गावे समाविष्ठ झाली आहेत.या मधे छोट्या मिळकतींचे प्रमाण जास्त आहे.मिळकत कर माफ झाल्यास या वर्गाला त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.असे मत धंगेकर यांनी सभागृहात व्यक्त केले.
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १० हजार कोठी रुपयांचा आहे .त्यामुळे मिळकतकारात सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पनात विशेष फरक पडणार नाही.महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती रोखल्यास पुणे महापालिकेला सहज शक्य आहे असे धंगेकर यांनी सभागृहाला सांगितले.





