Cricketer Suresh Raina : क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी समोर; सुरेश रैनाला ईडीने चौकशीसाठी दिल्लीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय?

Cricketer Suresh Raina : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याला ईडीने समन्स बजावली आहे. त्यामुळे १३ अॅागस्ट म्हणजे आज रैनाला नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. सुरेश रैना याला एका बेटिंग अॅपचा प्रचार केल्याबद्दल ईडीने समन्स बजाविण्यात आल्याची माहिती आहे.
ईडीने काही महिन्यांपूर्वी बंदी घातलेल्या बेटिंग वेबसाइट आणि ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक सेलिब्रिटींना नोटीस पाठवली होती. यात सुरेश रैना याचंही नाव होतं. 1xBet नावाच्या सट्टेबाजी अॅपशी संबंधित प्रकरणात रैनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, यामुळे क्रिकेटप्रेमींसह संपूर्ण देशात चर्चेला उधाण आले आहे. २०२४ मध्ये सुरेश रैना हा 1xBet चा ब्रँड ॲम्बेसिडर देखील होता.
नेमकं प्रकरण काय?
रिपोर्ट्सनुसार, बेटिंग अॅप आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र, त्यानंतरही सर्व ॲप्स आणि वेबसाइट वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहेत. यांना प्रमोट करण्याचं काम सेलिब्रिटी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा बंदी घातलेल्या अॅप्स आणि वेबसाईटला मोठी प्रसिद्धी मिळते. या प्रकरणात सुरेश रैना याचंही नाव समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणासंबंधी आज बुधवारी ईडीकडून त्याची चौकशी केली जाणार आहे.
सुरेश रैना याचं या प्रकरणात नाव आल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. रैनाचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या प्रकरणाचा त्यांच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्याच महिन्यात ईडीने बंदी घातलेल्या बेटिंग अॅप्स आणि बेटिंग प्लॅटफॅार्म प्रकरणी सेलिब्रिटींना समन्स पाठवलं आहे. पुढील काळातही या प्रकरणी आणखी काही नाव समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : अमेरिकेच्या करवाढीदरम्यान पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार? : कधी आणि कुठे होणार भेट ? वाचा





