डॉ. राजू गुरव
पुणे – राज्यातील विविध ठिकाणच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. त्याचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याचा मार्ग निवडला आहे.
या अजब उपायामुळे प्रशासन अधिकाऱ्यांची “इकडे आड, तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, या अदलाबदलीमुळे कार्यालयातील कारभारात पारदर्शकता येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बहुसंख्य विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अनागोंदी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. काही कार्यालयात आर्थिक “वजन’ ठेवल्याशिवाय प्रकरणे निकाली निघत नसल्याचे समोर आले आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना या प्रकारांना सामोरे जावे लागते. कामे मार्गी लावून घ्यायची असल्याने ते उघडपणे तक्रारी करण्याचे धाडस दाखवित नाहीत.
प्रशासन अधिकाऱ्यांची अदलाबदल
- प्रशासन अधिकारी – मूळ आस्थापना – नवीन जबाबदारीचे कार्यालय
- डॉ. डी. पी. माने – कोल्हापूर – पुणे
- प्रकाश बच्छाव – सोलापूर – कोल्हापूर
- हरिविजय शिंदे – पुणे – पनवेल
- डॉ. अर्चना बोऱ्हाडे – पुणे – जळगाव
- संभाजी सूर्यवंशी – औरंगाबाद – नांदेड
- वनिता सांजेकर – नागपूर – अमरावती
- ज्ञानदा कदम – मुंबई शुल्क समिती- मुंबई