Excessive Thirst: उन्हाळ्यात उष्णतेमुळे वारंवार तहान लागणे आणि घसा कोरडा पडणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. मात्र, पुरेसे पाणी पिल्यानंतरही जर तुमचा घसा सतत कोरडा पडत असेल, तर ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. हे शरीराकडून मिळणारा एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला जेरोस्टोमिया असे म्हणतात. ही समस्या मुख्यतः तोंडात लाळ कमी तयार झाल्यामुळे होते. आपल्या तोंडातील लाळ ग्रंथी योग्य प्रमाणात लाळ तयार करत नसतील, तर तोंड कोरडे पडते. लाळ ही फक्त तोंड ओलसर ठेवत नाही, तर अन्न पचवण्यास मदत करते आणि तोंडातील जंतूंशी लढण्याचे कामही करते. त्यामुळे लाळ कमी झाल्यास खाणे, चावणे आणि गिळणे कठीण होते. तज्ज्ञांच्या मते, वारंवार तोंड कोरडे पडणे हे काही गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. विशेषतः मधुमेह हा त्यातील प्रमुख आजार आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनी जास्त काम करते, त्यामुळे वारंवार लघवी होते आणि शरीरातील पाणी कमी होते. यामुळे घसा आणि तोंड कोरडे पडते. (Excessive Thirst) Excessive Thirst याशिवाय ही समस्या अल्झायमर, स्ट्रोक, एचआयव्ही किंवा नर्व्ह डॅमेजसारख्या आजारांशीही संबंधित असू शकते. काही वेळा ही समस्या ऑटोइम्यून आजारांमुळेही उद्भवते. औषधांचे साइड इफेक्ट हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते. जर तुम्ही उच्च रक्तदाब, अॅलर्जी किंवा मानसिक ताण यांसाठी औषधे घेत असाल, तर त्यांचा परिणाम लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो. त्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या वाढू शकते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. शरीराला योग्य प्रकारे हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. आहारात लिंबूपाणी, नारळपाणी आणि ओआरएसचा समावेश करावा. तसेच टरबूज, खरबूज, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत. चहा, कॉफी आणि थंड पेये कमी घ्यावीत, कारण ती शरीर अधिक डिहायड्रेट करतात. Excessive Thirst ताजेपणा टिकवण्यासाठी पाण्यात पुदिन्याची पाने घालून पिणेही फायदेशीर ठरते. मात्र, या सर्व उपायांनंतरही समस्या काही दिवस कायम राहिली, किंवा अन्न चावणे-गिळणे कठीण झाले, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. Excessive Thirst एकूणच, वारंवार घसा कोरडा पडणे ही साधी गोष्ट नाही. वेळेत लक्ष दिल्यास गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.