#ICCWorldCup2019 : विश्वचषक स्पर्धेत खेळण्यात उत्सूक – विजय शंकर
Updated On:

हैदराबाद – इंग्लंड आण्इ वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघची नुकतीच घोषणा करण्यात आली असून य संघात नऊ खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत सहाभागी होणार असून यात अष्टपैलू खेळाडू विजय शंकरची देखील वर्णी लागली आहे. यावेळी बोलताना शंकरने आपल्या निवडी बद्दल आनंद व्यक्त करताना विश्वचषक स्पर्धेत आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळायला मिळत असल्याने मी उत्सूक असल्याचे त्याने सांगितले.
यावेळी बोलताना शंकर म्हणाला की, भारतीय संघात निवड झाल्याचा खूप आनंद आहे. मी स्पर्धेसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. विराटच्या नेतृत्त्वात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. विश्वचषकासाठीच्या संघत माझी निवड होईल याची मला आशा होती. त्यामुळे टेलिव्हिजनसमोरच बसलो होतो. माझे नाव घोषित झाल्यानंतर मला खूप आनंद झाला असेही शंकरने यावेळी नमूद केले.





