Haidrabad Brutal Murder : माजी सैनिक अधिकारी बनला राक्षस! १३ वर्षांचा सुखी संसार केलेल्या पत्नीलाच संपवलं; कारण ऐकूण संताप येईल

हैद्राबादः दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. या हत्या प्रकरणातील क्रूरता अतिशय भयावह पद्धतीची होती. या हत्या प्रकरणात आरोपीने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. अशीच एक धक्कादायक घटना हैद्राबाद येथे घडली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे.
येथील एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली असून त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. हे केलेले तुकडे आरोपीने प्रेशर कुकरमध्ये घालून शिजवले. त्यानंतर मांस आणि हाडं वेगळी करुन एका गोणीत गोळा केली आणि तलावात फेकून दिली. या घटनेने हैद्राबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.आरोपी पत्नीने पोलिसांसमोर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पती हा माजी सैनिक आहे.
कडाक्याच भांडण अन् हत्या
पोलीस निरीक्षक नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरूमूर्ती (वय वर्ष ४५) असे या माजी सैनिकाचे नाव आहे. गुरुमुर्ती यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना २ मुलं आहेत. दोघांचाही सुखी संसार सुरू होता. मात्र, एक दिवस दोघांच कडाक्याच भांडण झाल आणि त्यातून हत्या केल्याची कबुली गुरुमुर्ती याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत गुरुमुर्ती याने जे काही सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. दोघा पती पत्नीमध्ये भांडण झालं. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. बाथरुमध्ये मृतदेह नेला आणि तिथे पत्नीचे तुकडे केले. यानंतर मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकले. नंतर मांस आणि हाडं वेगळी करून तलावात फेकून दिली.





