Nagarparishad Election 2025 | राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु अनेक ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे अनेक मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद येथील नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धा तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे. सध्या कर्मचाऱ्याकडून मतदान मशीन सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या तांत्रिक बिघाडाचा फटका मतदारांना सहन करावा लागतो आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक 2 मधील 1 नंबर बुथवरील मशीन 1 तासापासून बंद आहे. भाजप उमेदवार शितल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल झाले असून मशीन बंद पडल्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. ईव्हीएम मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील नगर परिषद उर्दू शाळेतील देखील EVM मशीन बंद पडले आहे. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. सांगलीच्या आष्टी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन नादुरुस्त असल्याने सकाळी ९ पर्यंत मतदान ठप्प होते. मात्र २ तासांच्या प्रतिक्षेनंतर ९ वाजल्यापासून मतदान सुरळीत सुरू झाले. Nagarparishad Election 2025 | बुलढाणा, चिपळूणमध्येही तांत्रिक बिघाड बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक ८ येथील मतदान केंद्र क्रमांक ८ आणि २मध्ये मशीनमध्ये बिघाड झाला. परिणामी गेल्या 35 मिनिटांपासून मतदान ठप्प झालं आहे. तर अद्यापही मतदान सुरू झालेलं नाही. त्यामुळे मतदारांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे चिपळूण मध्ये देखील EVM मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबले आहेत, याकरिता प्रशासनाकडून मशीन सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. Nagarparishad Election 2025 | बोगस मतदान समोर बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठीही मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र असून येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एकाने मतदान करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीही असल्याचे दिसून आल्यानंतर दोघांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. हेही वाचा: kareena kapoor: सोशल मीडियावर करीनाचा धमाल खुलासा, ‘सैफ, बोलायचं होतं… पण मुलांनी थांबवलं!’