तृप्ती डिमरीला करायच्या आहे प्रत्येक प्रकारच्या ‘भूमिका’

Entertainment | संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरच्या विरुद्ध भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या चाहत्यांनी तिला राष्ट्रीय क्रश घोषित केले. या चित्रपटातून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याआधी तृप्तीने ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’, ‘काला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता या अभिनेत्रीने कॉमेडीच्या दुनियेत प्रवेश केला आहे. तिचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट १५ जुलैला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तृप्तीचा हा पहिलाच विनोदी चित्रपट असेल.
अभिनेत्रीचा चित्रपट ‘बॅड न्यूज’ रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल आणि एमी विर्क देखील दिसणार आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटाची स्टारकास्ट जोरदार प्रमोशन करत आहे. त्याचवेळी, एका संभाषणात अभिनेत्रीने कॉमेडी हा सर्वात कठीण प्रकार असल्याचे वर्णन केले आहे.
‘बुलबुल’ आणि ‘काला’ सारख्या ड्रामा चित्रपटांचा एक भाग असलेल्या या अभिनेत्रीने विनोदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगताना सांगितले की, मी नेहमीच नाटक प्रकारातील अनेक चित्रपट केले आहेत, पण मला असं वाटतं की एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करत राहणं आणि स्वतःला आव्हान देत राहणं खूप महत्त्वाचं आहे. मला कॉमेडी करणं सुरुवातीपासूनच थोडं कठीण वाटलं. मला ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी अशा सर्व प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा असल्यचेही तिने सांगितले.
तृप्तीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘बॅड न्यूज’ नंतर ती कार्तिक आर्यन आणि विद्या बालनसोबत ‘भूल भुलैया’च्या पुढील भागात मध्ये दिसणार आहे. डिमरीकडे ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ आणि शाझिया इक्बालचा ‘धडक 2’ देखील आहे.





