प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली ग्वाही

बिबवेवाडी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराच्या व लोकहिताची कामे करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही देत असल्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट पर्वती विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
शहराध्यक्ष मानकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधासभा प्रभाग अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव नेमुन त्यांना पदनियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मानकर बोलत होते. समाजहितासाठी काम करा, आपला पक्ष हा प्रत्येक घटकापर्यंत पोचवा व त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी प्रदिप सांगळे, सुशांत ढमढेरे, प्रणाली गुंड, ओंकार बिबवे, अमोल ओव्हाळ, रुपाली कदम, शिवाजी शिंदे, पार्थ मिटकरी, राहुल गुंड, विजय बगाडे, प्रशांत कदम, राहुल भुजबळ, अर्जुन रावते, सतीश धर्मावत यांच्या विविध पदावर निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रदीप देशमुख, समीर चांदेरे, संतोष नांगरे, शिवाजी गदादे, विपुल म्हैसुरकर, रामदास गाडे, शशिकला कुंभार, जयदेव इसवे, रूपेश आखाडे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





