इंग्लिश प्रिमियर लीग : आर्सेनालला पराभवाचा धक्का

लिव्हरपूल – बचावपटू पी. जगिल्काने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये एव्हर्टन संघाने आर्सेनाल संघाचा पराभव केला. पाहिल्या चार संघात कायम राहत पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान पक्‍केकरण्याच्या दृष्टीने अर्सेनालसाठी हा सामना महत्त्वाचा होता. या पराभवानंतर ही ते चौथ्या स्थानी असले तरी आगामी सामन्यात एकही पराभव स्वीकारला तर चॅम्पियन्स लीगमध्ये त्यांचे स्थान धोक्‍यात येईल

पाहिल्या सत्रातील दहाव्या मिनिटाला एव्हर्टन संघाने गोल केला. त्यामुळे सामन्यात त्यांचा खेळ बहरला. सामन्यात त्यांनी आक्रमक धोरण अवलंबत 23 वेळा गोल करण्यासाठी फटके मारले. त्यातील 7 फटके हे गोलच्या दिशेने होते तर इतर स्वैर होते. तर, आर्सेनल केवळ 2 वेळा अचूक फटके मारू शकले. त्यात एकही गोल झाला नाही. चेंडूवर ताबा, पासमधील नियंत्रण आणि यलो कार्ड या सर्व बाबीत आर्सेनालचा संघ सामन्यात अग्रेसर राहिला. परंतु, त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने त्यांनी सामना 1-0 अशा फरकाने गमावला.

Leave A Reply

Your email address will not be published.