Adinath Kothare and Urmila: “जोडीदार म्हणून आमचा प्रवास संपत असला, तरी…”; आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांचा घटस्फोट
Adinath Kothare and Urmila: लग्नानंतर १५ वर्षांनी आदिनाथ-उर्मिला विभक्त

Adinath Kothare and Urmila: अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्यात काही तरी बिनसलं असल्याची चर्चा काही वर्षांपासून सोशल मिडियावर सुरू होती. उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चा सुरू होती. याशिवाय ती आदिनाथच्या ‘पाणी’ सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा गैरहजर होती. त्यामुळे दोघे वेगळे होणार असल्याचे म्हंटले जात होते.
अखेर या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. इन्स्टाग्रामवर संयुक्तरित्या पोस्ट शेअर करत आदिनाथ-उर्मिलाने विभक्त होणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच 8 वर्षांची लेक जिजाचं संगोपण ते एकत्र, जबाबदारीने करणार असल्याचेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले?
आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर… एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने आम्ही (आदिनाथ म. कोठारे आणि उर्मिला कानेटकर) पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत.
ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांत मीडियाने आणि चाहत्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.
म्हणूनच, आमच्या या खासगी प्रवासात… मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.
दरम्यान, ‘शुभमंगल सावधान’ सिनेमादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. नायिका म्हणून उर्मिलाचा तो पहिलाच चित्रपट होता आणि त्या चित्रपटात आदिनाथ सहाय्यक दिग्दर्शक होता. सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्याचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं होतं. यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती आणि आता लग्नानंतर १५ वर्षांनी आदिनाथ-उर्मिलाने विभक्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. Adinath Kothare and Urmila
हेही वाचा:





