सुप्रसिध्द अभिनेत्याला ओळखणेही झालं अवघड; नेटकरी म्हणाले, ‘बाबा रामदेव…’

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता धनुषने अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्याच्या लुकची चर्चा रंगली आहे. धनुषचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यातील त्याचा लुक पाहून त्याला ओळखणे देखील अवघड झाले आहे. यात त्याने केस आणि दाढी वाढवल्याचे दिसते.
सोमवारी सकाळी धनुषला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. तेव्हा छायाचित्रकारांनी त्याचे काही व्हिडिओ शेअर केले आहे. व्हायरल व्हिडिओत धनुषची दाढी आणि केस वाढल्याचे दिसते. यावेळी त्याने गुलाबी रंगाचा स्वेटशर्ट आणि काळी ट्रॅक पँट घातली होती. याशिवाय त्याने काळ्या रंगाचा गॉगलही घातला असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून काही जण त्याला ‘पुष्पा’ चित्रपटाची कॉपी केल्याचे म्हणत आहे. तर काही जण त्याला ‘बाबा रामदेव’ म्हणत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
धनुषने हा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी केला असल्याचे सांगितले जात आहे. ‘वाथी’ चित्रपटानंतर धनुष अरुण माथेश्वरनच्या ‘कॅप्टन मिलर’ या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात धनुष, प्रियंका अरुल मोहन आणि शिव राजकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.





