Euro Cup 2024 : इंग्लंडची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक, नेदरलँड्सला केलं पराभूत…

Euro Cup 2024 :- इंग्लंडने युरो कप 2024 मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने प्रथमच देशाबाहेर आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 1966 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक आणि 2020 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या युरो चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
येत्या रविवारी 14 जुलैला आता विजेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा सामना स्पेनशी होईल, ज्याने उपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला होता. इंग्लंडला तब्बल 58 वर्षांनंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. याआधी इंग्लंडने 1966 मध्ये विश्वचषक जिंकला होता. तर 2020मध्ये युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचले पण विजेतेपद पटककावण्यात अपयशी राहिले.
Euro Cup 2024 : एका तपानंतर स्पेन अंतिम फेरीत, उपांत्य फेरीत फ्रान्सवर केली मात….
सामना संपण्यापूर्वी दोन्ही संघ 1-1 गोलने बरोबरीत असल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटवरच होईल असे वाटत होते. पण इंग्लंडच्या ऑली वॉटकिन्सने दिलेल्या अतिरिक्त मिनिटात गोल करत इंग्लंडला 2-1 ने आघाडीवर नेले आणि अंतिम फेरी गाठली. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघांकडून 1-1 गोल झाले होते.
Late Watkins winner sends England into the final! 🏴#EURO2024 | #NEDENG pic.twitter.com/2zZj9AWUEC
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 10, 2024
सामन्याच्या 10व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या जावी सिमन्सने बॉक्सच्या बाहेरून बॉल गोलपोस्टमध्ये पाठवत डच संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण 8 मिनिटांनी म्हणजेच 18व्या मिनिटाला हॅरी केनने गोल करत इंग्लंड संघाला सामन्यात बरोबरीत आणले. या गोलनंतर इंग्लंडच्या संघात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि हाफ टाईम संपेपर्यंत त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून बदल करण्यात आले. नेदरलँड्सने डोन्याल मालेनच्या जागी व्होथ वेघोर्स्टला संघात घेतले, तर इंग्लंडने किरन ट्रिपियरच्या जागी ल्यूक शॉला संघात घेतले. यासह दुसऱ्या हाफ संपण्याच्या 20 मिनिटांपूर्वी, इंग्लंडने हॅरी केन आणि फिल फोडेन यांच्या जागी ऑली वॅटकिन्स आणि कोल पामर यांना संघात घेतले. इंग्लंडचा हा निर्णय अगदी योग्य ठरला, जेव्हा ऑली वॉटकिन्सने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि विजयासह संघाने अंतिम फेरीत गाठली.





