बडोद्यातही जातीय दंगल; 22 जणांना अटक
Updated On:

बडोदा – गुजरातच्या बडोदा शहरात एका किरकोळ अपघातानंतर जातीय संघर्ष पेटला, त्यातून दंगलखोरांनी दगडफेक केली, मंदिराची तोडफोड केली आणि काही वाहनांचे नुकसान केले, या हिंसक प्रकारात तीन जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. कारलीबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील रावपुरा परिसरात दोन समाजातील लोकांमध्ये दुचाकी वाहनांच्या अपघातानंतर मोठी धुमश्चक्री झाली.
त्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. काही वेळातच कारलीबाग परिसरात दोन समाजातील लोक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.
एका जमावाने रस्त्याच्या कडेला असलेल्या देवस्थानातील मूर्ती, दोन ऑटोरिक्षा आणि अनेक दुचाकींची तोडफोड केली. तेथे जादा पोलिस बंदोबस्त तैनात करून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

