वाघोली (पुणे) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक कल्याण समिती स्थापन करण्याची मागणी माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबई राजभवन येथे सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, सैनिक फेडरेशनचे कार्यकर्ते व कोर कमिटीचे सदस्य अनिल सातव, आनंद ठाकूर, संपत दिघे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याबाबत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान राज्यपाल यांनी आपण सैनिकांच्या प्रश्नावर स्वतः लक्ष देऊ असे आश्वासन सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे व शिष्टमंडळाला दिले.