ईशा देओलचे कमबॅक; ‘या’ अभिनेत्रीसोबत चित्रपटात करणार काम

Esha Deol | ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. भरत तख्तानीसोबत तिने लग्न केले होते. मात्र लग्नाच्या 12 वर्षानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या परिस्थितीतून सावरत ईशा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज होणार आहे.
विक्रम भट यांच्या सिनेमातून ती पुन्हा स्क्रीनवर दिसणार आहे. नुकतेच ईशा देओल आगामी सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ‘तुमको मेरी कसम’ असं सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटात ईशा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अदा शर्मा, अनुपम खेर आणि इश्वाक सिंह हे कलाकारही आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये ईशा देओल यावेळी अदा शर्माच्या बाजूला बसली होती. प्रिंटेड स्कीन टाईट गाऊनमध्ये ती ईशा फारच सुंदर दिसत आहे. Esha Deol |
View this post on Instagram
विक्रम भट यांनी एक नाही तर चार सिनेमांची घोषणा केली आहे. ‘तुमको मेरी कसम’ शिवाय ‘रण’, ‘विराट’ आणि ‘तू मेरी पूरी कहानी’ हे देखील सिनेमे येणार आहेत. यातील ‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटात ईशा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ईशा पुन्हा चित्रपटात दिसणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. अनेकांनी तिला शुभेच्छा तिचे कौतुक केले आहे. Esha Deol |
हेही वाचा:
जपानच्या पंतप्रधानांचा राजीनामा जाहीर ; निवडणूक लढवण्यास नकार, जाणून घ्या कारण





