Esha Deol Viral Photo | अभिनेत्री ईशा देओलने पती भरत तख्तानीसोबत मागील वर्षी घटस्फोट घेतला होता. १२ वर्षांनंतर विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाने त्यांचे कुटुंबच नाही, तर चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र आता घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. भरत तख्तानीने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ईशा देओलसोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत ईशाची बहीण अहाना देओल देखील आहे. फोटो शेअर करत भरतने कॅप्शनमध्ये ‘फॅमिली संडे’ असे लिहून हार्ट इमोजी पोस्ट केला. एकीकडे भरतच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे माजी पत्नी ईशासोबतचा हा ‘फॅमिली संडे’चा फोटो पाहून काही चाहते गोंधळले आहेत. तर काहींनी दोघांना पुन्हा एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे. ईशा आणि भरत यांचा घटस्फोट झाला असला, तरी दोघांनी मुलांचे संगोपन एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या या घटस्फोटाचे कारण भरतचे दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध असल्याच्या चर्चा होत्या. काही काळापूर्वी भरतने मेघना लखानीसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, ईशा आणि भरतचे लग्न २०१२ मध्ये झाले होते आणि त्यांना दोन मुली आहेत. Esha Deol Viral Photo | हेही वाचा: लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार की नाही? eKYC बाबत अडचण चिंता वाढली…