पुणे | एर्नाकुलम, आझाद हिंद एक्स्प्रेस उशिराने

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून सुटणाऱ्या पुणे-एर्नाकुलम पूर्णा एक्स्प्रेसला पाच तास तर पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस साडेपाच तास उशीराने सुटली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस ही गाडी शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटणार होती. पण, तिचा येणाऱ्या रेकला उशीर झाल्यामुळे ती गाडी रविवारी पहाटे साडेतीन वाजता सुटली.
तर, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ही शनिवारी सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सुटणार होती.
ती मध्यरात्री सव्वाबारा वाजता सुटली. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली. गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्टेशन येथून सुटणाऱ्या गाड्यांना सतत उशीर होत आहे.
त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशा सुविधा देखील नाहीत.
त्यामुळे गाड्यांना उशीर झाल्यानंतर प्रवाशांची तारांबळ उडते. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांचे रेक पुण्यात वेळेवर येत नसल्याचा फटका बसत आहे.




