Epstein Files: अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीप्रकरणी आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच सुमारे ३० लाख पानांची ‘एपस्टीन फाइल्स’ (Epstein Files) सार्वजनिक केली असून, त्यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत.याच कागदपत्रांमध्ये प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे नाव आल्याने अमेरिकेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. गिलेन मॅक्सवेलच्या घरात चित्रपटाची पार्टी या फाइल्समधील एक महत्त्वाचा तपशील २१ ऑक्टोबर २००९ रोजीच्या एका ई-मेलमधून समोर आला आहे. प्रसिद्ध पब्लिसिस्ट पेगी सीगल यांनी जेफ्री एपस्टीनला पाठवलेल्या या ई-मेलमध्ये, मीरा नायर यांच्या ‘अमेलिया’ या चित्रपटाच्या प्रीमियरनंतरची आफ्टर पार्टी गिलेन मॅक्सवेलच्या न्यू यॉर्कमधील घरात आयोजित करण्यात आल्याचा उल्लेख आहे. गिलेन मॅक्सवेल ही एपस्टीनची जवळची सहकारी होती आणि या प्रकरणात ती दोषी ठरली आहे. ई-मेलमध्ये पेगी सीगल यांनी लिहिलं आहे की, “मी आत्ताच गिलेनच्या घरातून निघाले. तिथे ‘अमेलिया’ चित्रपटाची पार्टी होती. त्या पार्टीला दिग्दर्शिका मीरा नायर यांच्यासह बिल क्लिंटन, जेफ बेझोस यांसारख्या मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या.” Zohran Mamdani and mira nair इतर बड्या नावांचाही उल्लेख या फाइल्समध्ये केवळ मीरा नायर यांचेच नाही, तर अनेक जागतिक पातळीवरील प्रभावशाली व्यक्तींची नावे पुन्हा एकदा समोर आली आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक यांचाही उल्लेख आहे. तसेच, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि जेफ्री एपस्टीन यांच्यातील २०१२ सालचा एक ई-मेल संवादही या कागदपत्रांत आढळतो. त्या ई-मेलमध्ये मस्कने एपस्टीनला, “तुझ्या आयलंडवर सर्वात वाइल्ड पार्टी कधी असते?” असा प्रश्न विचारल्याचा उल्लेख आहे. जोहरान ममदानी यांच्यावर परिणाम होणार? हा सगळा खुलासा अशा वेळी झाला आहे, जेव्हा मीरा नायर यांचे पुत्र जोहरान ममदानी हे सध्या न्यू यॉर्कचे महापौर आहेत. त्यांच्या आईचं नाव अशा वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांत आल्याने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा, टीका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत.